श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगावच्या सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:11 PM2018-06-13T14:11:50+5:302018-06-13T14:11:50+5:30

लिंपणगावच्या (ता. श्रीगोंदा) सरपंच रेणुका धस यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.

Approval Resolution against the Sarpanch of Limpangala in Shrigonda Taluka | श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगावच्या सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव मंजूर

श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगावच्या सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव मंजूर

Next

काष्टी : लिंपणगावच्या (ता. श्रीगोंदा) सरपंच रेणुका धस यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.
तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदस्यांच्या बैठक झाली. बैठकीस १५ पैकी १० सदस्य उपस्थित होते. सरपंच धस यांच्यासह पाच सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. तहसिलदारांनी सरपंचाविरुध्द दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध ० मतांनी मंजूर झाल्याचे जाहीर केले. सरपंच पदासाठी माधुरी साळवे, रवी उजागरे, मंजुळा ओव्हळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. पाचपुते गटाकडून माधुरी साळवे, नागवडे गटाकडून रवी उजागरे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Approval Resolution against the Sarpanch of Limpangala in Shrigonda Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.