अण्णा हजारेंची घेतली आठवलेंनी भेट; अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालले पाहिेजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:26 PM2020-01-25T12:26:01+5:302020-01-25T12:27:06+5:30

स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालविले पाहिजेत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्यासाठी हजारे यांनी सुरू केलेल्या मौनव्रताला आमचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

Anna Thousands visit to ramdas athvle | अण्णा हजारेंची घेतली आठवलेंनी भेट; अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालले पाहिेजेत

अण्णा हजारेंची घेतली आठवलेंनी भेट; अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालले पाहिेजेत

Next

पारनेर : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी फाशीच्या शिक्षेचा कायदा संसदेने संमत केला आहे. तरीही असे अत्याचार होतात. देशात गंभीर गुन्हे घडत आहेत. स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालविले पाहिजेत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्यासाठी हजारे यांनी सुरू केलेल्या मौनव्रताला आमचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुुरुवारी रात्री राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. दिल्लीतील निर्भया हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी व इतर मागण्यांसाठी हजारे यांचे मौन आंदोलन सुरू आहे. येथे मंत्री आठवले यांनी अण्णांशी लिखित संवाद साधला. 
१ फेब्रुवारी रोजी निर्भया हत्याकांडातील सर्व दोषींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फाशी दिली जाईल. त्यानंतर हजारे मौनव्रत सोडतील,  असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, सुनील साळवे, हेमंत रणपिसे, प्रवीण मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, अमित जाधव आदी उपस्थित होते. 

Web Title: Anna Thousands visit to ramdas athvle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.