शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

बोलेरोतून दारूची वाहतूक : एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 3:58 PM

बोलेरो वाहनातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाठलाग करून एकास ताब्यात घेतले.

अहमदनगर: बोलेरो वाहनातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाठलाग करून एकास ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी ४ लाख ४६ हजार रूपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली.नगर-राहुरी रोडने बोलेरो वाहनातून दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांना मिळाली होती. माहितीनुसार निरिक्षक धनंजय लगड, कॉ. प्रविण साळवे व बी.एम. चत्तर यांच्या पथकाने नगर-मनमाड रोडवर सापळा लावला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चॉकलेटी रंगाची बोेलेरो राहुरीच्या दिशेने जाताना दिसली. पथकाने बोलेरो चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला.  तो मात्र सुसाट राहुरीच्या दिनेशेने पसार झाला. पथकाने तत्काळ त्याचा पाठलाग केला़ पंधरा मिनिट बोेलोरोचा पाठलाग केल्यानंतर राहुरी परिसरात वाहन अडविण्यात आले. यावेळी अनिकेत लोंढे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ लाख ४६ हजार ३५५ रूपयांची दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लोंढे याने ही दारू कोठून आणली याची माहिती उत्पादन शुल्कचे पथक घेत आहे. ही दारू राहुरी परिसरातील हॉटेलचालकांना विकण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस