Ahmednagar: हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

By अरुण वाघमोडे | Published: July 10, 2024 07:48 PM2024-07-10T19:48:04+5:302024-07-10T19:48:23+5:30

Ahmednagar News: अवतार मेहेरबाबानी १० जुले १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले होते. या दिवसाची आठवण म्हणून बुधवारी नगर शहराजवळील दौंड रोडवरील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी मौन पाळले.

Ahmednagar: Silence observed by thousands of Meher lovers | Ahmednagar: हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

Ahmednagar: हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

- अरुण वाघमोडे
अहमदनगर - अवतार मेहेरबाबानी १० जुले १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले होते. या दिवसाची आठवण म्हणून बुधवारी नगर शहराजवळील दौंड रोडवरील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी मौन पाळले. भाविकांनी २४ तास मौन पाळले. त्यामुळे दर्शनासाठी आलेले भाविकांनी एकमेकांशनी हातवारे करूनच संवाद साधताना दिसले.
बुधवारी सकाळी ६ वाजता दर्शनासाठी बाबांची समाधी खुली करण्यात आली. मौन दिनानिमित्त देशभरातून भाविक मेहेराबाद येथे आले होते. यावेळी सर्वत्र शांतता होती. टाचणी पडली तरी समजेल इतके शांत वातावरण होते. मेहेरबाबांनी ३ वेळा मौन पाळले होते. परंतु १० जुलै, १९२५ रोजीची सुरु केलेले मौन त्यांनी आयुष्यभर पाळले व एक शब्द कधीही उच्चारला नाही. ते ३१ जानेवारी १९६९ पर्यंत ४४ वर्षांपर्यंत बोलले नाही. बाबांनी त्याकाळी संवाद साधण्यासाठी एबीसीडीचा बोर्ड वापरला होता.

Web Title: Ahmednagar: Silence observed by thousands of Meher lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.