शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राज्यात सर्वाधिक शेततळे अहमदनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 2:40 PM

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली.

ठळक मुद्दे९ हजार कामे पूर्ण : शेतकऱ्यांना ४५ कोटींचा हातभार, १८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

चंद्रकांत शेळके अहमदनगर : राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली. त्यात मे २०१८ अखेर अहमदनगर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ९ हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापोटी शेतकºयांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे ४५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. या योजनेतून १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर, तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी २०१६मध्ये ‘मागेल त्याला शेतततळे’ ही योजना आणली.जिल्हा, लक्षांक,पूर्ण कामेअहमदनगर ९२००, ९१००औरंगाबाद ९१००, ६९२०नाशिक ९०००, ६१०३सोलापूर ८०००, ४७६८बीड ६५००, ५०४३जालना ६०००, ५६५६बुलढाणा ५०००, ३६५१लातूर ४८००, १६२७सांगली ४५००, ३६४३अमरावती ४५००, ३२४८यवतमाळ ४५००, ५०९०नांदेड ४०००, १४८

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला.दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला. दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.कामे झालेल्या सर्व लाभार्थींना अनुदान वाटप झाले आहे. त्यामुळे अजून ५ हजार कामांची आखणी झालेली आहे. याबाबत शासनाकडून वाढीव उद्दिष्ट घेतले जाईल. एकूणच शेततळ्यांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.-पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी