गाडीची घंटा वाजली... शेवगाव आगाराच्या ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, १०० टक्के बसेस सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 02:27 PM2021-11-26T14:27:36+5:302021-11-26T14:28:18+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते

After the strike of ST employees of Shevgaon depot, 100 percent buses started | गाडीची घंटा वाजली... शेवगाव आगाराच्या ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, १०० टक्के बसेस सुरू

गाडीची घंटा वाजली... शेवगाव आगाराच्या ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, १०० टक्के बसेस सुरू

Next
ठळक मुद्देएसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप लबडे यांनी आम्हाला वाढून दिलेली पगार वाढ मान्य असून निलंबन आदेश मागे घेण्याचे तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळणार नाही त्यांना हजेरी देण्याच्या अटीवर संप शेवगाव आगारापुरता मागे घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

शेवगाव : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव एसटी आगाराचे कर्मचारी व राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शेवगाव येथील एसटी कामगारांनी संप मागे घेतला आहे. वेळापत्रकानुसार शंभर टक्के बसेस पोलीस बंदोबस्तात मार्गावर सोडण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज यांनी सांगितले आहे.       

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते. तसेच बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे अतोनात हाल सुरु होते. दरम्यान शुक्रवारी दुपारी विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज तसेच शेवगाव आगारातील कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे व ज्या कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळणार नाही त्यांना देण्यात येणार असल्याचे ठरले आहे. 

एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप लबडे यांनी आम्हाला वाढून दिलेली पगार वाढ मान्य असून निलंबन आदेश मागे घेण्याचे तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळणार नाही त्यांना हजेरी देण्याच्या अटीवर संप शेवगाव आगारापुरता मागे घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. संप मागे घेताच कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली असून वेळापत्रकानुसार एसटीच्या बसेस वेगवेगळ्या मार्गावर पोलीस बंदोबस्तात सोडण्यात सुरवात झाली आहे. १०० टक्के मार्गावरील बसेस आज पासून १८ दिवसांनंतर रस्त्यावर धावणार आहेत. सर्वसामान्यांची लालपरी सुरु झाल्याने प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून शाळकरी विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या-जाण्यासाठीचा प्रवासाचा प्रश्न सुटला आहे.

Web Title: After the strike of ST employees of Shevgaon depot, 100 percent buses started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.