३९ अर्ज बाद, ४ प्रलंबित

By admin | Published: September 30, 2014 01:03 AM2014-09-30T01:03:10+5:302014-09-30T01:29:46+5:30

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदारसंघात ३१६ अर्ज दाखल झाले होते़ यापैकी ३९ अर्ज बाद झाले असून, शहर मतदारसंघातील ४ अर्जांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे़

After application 3, 4 pending | ३९ अर्ज बाद, ४ प्रलंबित

३९ अर्ज बाद, ४ प्रलंबित

Next


अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदारसंघात ३१६ अर्ज दाखल झाले होते़ यापैकी ३९ अर्ज बाद झाले असून, शहर मतदारसंघातील ४ अर्जांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे़ अर्ज माघारीसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे़
विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदारसंघात ३१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते़ नगर शहर मतदारसंघासह बारा मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत प्राप्त झालेल्या उमेदवारांची अर्जांची छाननी करण्यात आली़ यावेळी उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली असून,नगर शहर मतदारसंघातील चार अर्जांवर सेनेचे आ़ अनिल राठोड यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला़ अपक्ष चार उमेदवारांच्या प्रस्तावकाच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याची तक्रार राठोड यांनी केली आहे़ या चार अपक्ष उमेदवारांच्या अर्जाची संक्षिप्त चौकशी करून मंगळवारी सुनावणी होणार आहे़
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्र काहींनी दाखल केली नाहीत़ त्यामुळे अपक्षांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत़ सर्वाधिक अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने बाद झाले आहेत़ पक्षाच्या वतीने दाखल केलेले त्यांचे अर्ज बाद झाले आहेत़ परंतु त्यांचे अपक्ष अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत़ राहुरी मतदारसंघातून प्रसाद तनपुरे यांचा सेनेतर्फे दाखल केलेला अर्ज बाद करण्यात आला आहे़ अकोले (१० पैकी २ बाद), संगमनेर ( १६ पैकी ३ बाद), शिर्डी ( २३ पैकी ६ बाद), कोपरगाव ( २७ पैकी ३ बाद), श्रीरामपूर- ( ४७ पैकी १ बाद), नेवासा ( २५ पैकी ४ बाद), शेवगाव-( ३६ पैकी ५ बाद), राहुरी ( २३ पैकी ३ बाद), पारनेर ( २३ पैकी २ बाद), नगर शहर ( १९ पैकी ३ बाद, चार निर्णय राखीव),श्रीगोंदा ( २९ पैकी ५ बाद), कर्जत- जामखेड ( २९ पैकी ३ बाद)़ (प्रतिनिधी)

Web Title: After application 3, 4 pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.