वाळू तस्करांवर कारवाई;  एका महिन्यात अकरा लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:10 PM2020-10-02T15:10:28+5:302020-10-02T15:11:16+5:30

प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार यांनी एका महिन्यात  चार ठिकाणी अवैध  पध्दतीने जमा केलेल्या चार वाळूचे साठे जप्त केले.  याप्रकरणी ५ लाख ४६ हजाराचा  महसूल जमा केला आहे.  तर चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६ लाख ६ हजार ७१ इतका दंड वसूल केला आहे. 

Action against sand smugglers; A fine of Rs 11 lakh in a month | वाळू तस्करांवर कारवाई;  एका महिन्यात अकरा लाखांचा दंड

वाळू तस्करांवर कारवाई;  एका महिन्यात अकरा लाखांचा दंड

Next

श्रीगोंदा : प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार यांनी एका महिन्यात  चार ठिकाणी अवैध  पध्दतीने जमा केलेल्या चार वाळूचे साठे जप्त केले.  याप्रकरणी ५ लाख ४६ हजाराचा  महसूल जमा केला आहे.  तर चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६ लाख ६ हजार ७१ इतका दंड वसूल केला आहे. 


 पेडगाव येथे अवैध वाळू उपसा करणा-या १० व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.  म्हसे येथील घोड नदीपात्रातून १ वाहन अवैध वाळू वाहतूक करताना पकडले आहे.  ३५ ब्रास अवैध वाळू साठ्यांचा लिलाव करुन १ लाख ७५ हजार  वसूल केले आहेत.

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेल्या यंत्रसामग्रीवर  दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशारा चारुशीला पवार यांनी दिला आहे. 

Web Title: Action against sand smugglers; A fine of Rs 11 lakh in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.