श्रीगोंद्यात खाजगी रुग्णालयातील बेड अधिग्रहण; डॉक्टरांंना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:22 AM2020-03-28T11:22:23+5:302020-03-28T11:24:04+5:30

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा शहर व काष्टी येथील खाजगी रुग्णालयातील ११६ बेड अधिग्रहण केले आहेत. रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. 

Acquisition of private hospital beds in Shrigonda; Instructions to get the doctor ready for 3 hours | श्रीगोंद्यात खाजगी रुग्णालयातील बेड अधिग्रहण; डॉक्टरांंना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना

श्रीगोंद्यात खाजगी रुग्णालयातील बेड अधिग्रहण; डॉक्टरांंना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना

Next

श्रीगोंदा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा शहर व काष्टी येथील खाजगी रुग्णालयातील ११६ बेड अधिग्रहण केले आहेत. रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. 
तीन महिने पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा शिल्लक आहे. पेट्रोल व डिझेल आवश्यकतेनुसार दिले जात आहे. कोरोनाचा वाढवा प्रादूर्भाव विचारात घेऊन नागरिकांनी घरात राहण्याची गरज आहे. काही दिवस दैनंदिन कामे संचार थांबवा. आराम करा. उद्या आपला लाख मोलाचा जीवच गेला तर काय करणार? अशी परिस्थिती आहे. 
पाच ठिकाणी भाजीपाला 
  श्रीगोंदा शहरात  शेलार हायस्कूल  संत शेख महंमद महाराज मंदिर पटांगण, दिल्ली वेश, लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे चौक, भैरवनाथ चौक भाजी विकणारांच्या जागा निश्चित केल्या आहेत. नागरिकांनी भाजीपाल्यासाठी विनाकारण गर्दी करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात एका ट्रॅक्टर औषध फवारणी फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे, असे नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी सांगितले.  
 

Web Title: Acquisition of private hospital beds in Shrigonda; Instructions to get the doctor ready for 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.