शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

अकोलेत पिचडांच्या सत्तेला सुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:39 PM

अकोले तालुक्यातील ४० वर्षांच्या पिचड घराण्याच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत व ‘तालुक्याचा विकास’ या मुद्याला ‘वॉश आऊट’ करत राष्ट्रवादीचे डॉ. किरण यमाजी लहामटे हे विधानसभेत पोहचले. भाजपचे वैभव पिचड यांचा ५७ हजार ६०५ इतक्या मतांनी पराभव करीत लहामटे ख-या अर्थाने ‘जायंट किलर’ ठरले. तालुक्याचे भगवेकरण होणे टळले आणि पुरोगामीत्व टिकून राहिले.

अकोले विधानसभा निवडणूक विश्लेषण - हेमंत आवारी । अकोले : तालुक्यातील ४० वर्षांच्या पिचड घराण्याच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत व ‘तालुक्याचा विकास’ या मुद्याला ‘वॉश आऊट’ करत राष्ट्रवादीचे डॉ. किरण यमाजी लहामटे हे विधानसभेत पोहचले. भाजपचे वैभव पिचड यांचा ५७ हजार ६०५ इतक्या मतांनी पराभव करीत लहामटे ख-या अर्थाने ‘जायंट किलर’ ठरले. तालुक्याचे भगवेकरण होणे टळले आणि पुरोगामीत्व टिकून राहिले.पहिल्या फेरीत बाराशे मतांची आघाडी, तिस-या फेरीला साडेसात हजार तर चौदाव्या फेरीला ३४ हजार अशी आघाडी घेत अखेरच्या २२ व्या फेरीअखेर डॉ.लहामटे यांनी ५७ हजारांनी पिचड यांना पराभवाची धूळ चारली. सर्व भागातून त्यांना आघाडी मिळाली. पिचड यांचा बालेकिल्ला असणा-या राजूर भागात व प्रवरा खो-यातही लहामटे यांना मोठी आघाडी मिळाली. आदिवासी पट्टा, प्रवरा-आढळा- मुळा  खोरे व पठार भागाने दिलेल्या अपेक्षित आघाडीने लहामटेंंनी गुलाल घेतला. डॉ.लहामटे यांना १ लाख १३ हजार २६७ मते मिळाली तर पिचड यांना अवघी ५५ हजार ६६२ मते मिळाली.तालुक्यात ४० वर्षांची सत्ता बदलली पण ‘घड्याळ’ मात्र पुन्हा विजयी झाले. तालुक्यातील शेतक-यांना भाजपचा विकास मान्य झाला नाही. जनतेला पिचडांचा पक्ष बदल मानवला नाही. जनता पुढाºयांमागे नाही. गावपुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला असे ईव्हीएम यंत्रातून गावागावातील चित्र पुढे आले आहे.१९९५ ला माजी मंत्री पिचड यांना सोडून सर्व पुढारी त्यांच्या विरोधात गेले होते. तेव्हा पिचडांसाठी जनता धावून आली होती. यावेळी तालुक्यातील सर्व मातब्बर पुढारी पिचडांभोवती एकवटल्याने जनतेने निवडणूक हातात घेत डॉ.लहामटे यांना साथ दिली.अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या सभांनी निवडणुकीत जान आणली तर शरद पवार यांच्या सभेने आघाडीचा विजय निश्चित केला होता. मुख्यमंत्र्यांची सभा पिचडांना विजयी करु शकली नाही. भरपावसात आघाडीच्या तरुणाईने विजयाचा जल्लोष साजरा केला.  विकासासाठी पक्ष बदल अकोलेकरांना रुचला नाही. ४० वर्षांनी विरोधकांनी प्रथमच गुलाल घेतला. जनतेने निवडणूक हाती घेतली होतीजनतेनेच निवडणूक हाती घेतली होती. मी एकटा नाही तर अकोले मतदारसंघातील सर्व जनताच ‘आमदार’ झाली आहे. सर्व घटक पक्ष तसेच माकप-भाकप व सेना भाजपातील हितचिंतकांनी मदत केली. विरोधकांचा लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न फसला. जनतेचा आदेश आणि त्यांचा विकास हाच माझा अजेंडा आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गळ्यातील भगवी शाल कधीच बाजूला करणार नाही, असे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी सांगितले.    

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019