ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 06:03 PM2021-02-20T18:03:02+5:302021-02-20T18:03:54+5:30

ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश पी.एन. राव यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिली.

Accused of beating Gram Sevak jailed | ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास

ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास

googlenewsNext

अहमदनगर : ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश पी.एन. राव यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला.

अरुण दादा रोकडे (रा.गजानन कॉलनी, नवनागापूर ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १८ सप्टेंबर २०१८ रोजी नवनागापूर येथे ग्रामसेवक संजय विश्वनाथ मिसाळ हे कार्यालयात काम करत होते. यावेळी आरोपी रोकडे याने कार्यालयात येऊन मिसाळ यांची गजांची पकडून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

  याबाबत मिसाळ यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

 

Web Title: Accused of beating Gram Sevak jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.