अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ६ कोरोना बाधित : जिल्ह्यात आकडा ६० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:24 PM2020-05-13T20:24:06+5:302020-05-13T20:30:17+5:30

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे.

6 corona found in the district during the day: 60 in the district | अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ६ कोरोना बाधित : जिल्ह्यात आकडा ६० वर

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ६ कोरोना बाधित : जिल्ह्यात आकडा ६० वर

Next

अहमदनगर : आज सकाळी नगर शहरातील सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा आणखी ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात एकूण ६ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे.

सायंकाळी बाधित आढळलेल्या ५ व्यक्तीपैकी ३ व्यक्ती मंगळवारी कोरोना बाधित आढळलेल्या सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत, तर १ व्यक्ती या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, तेथील रिसेप्सनिस्ट आहे. आणखी १ व्यक्ती निघोज येथील असून या व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ११ अहवाल प्राप्त झाले होते.

सारसनगर येथील बाधित व्यक्ती ड्रायव्हर असून त्याने पुणे-मुंबई प्रवास केल्याची माहिती आहे.ा या व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी सुभेदार गल्लीतील बाधित आढळलेल्या महिलेच्या निकट संपकार्तील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या महिलेने ज्या खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते, तेथील रिसेप्शनीस्टही बाधित आढळून आली.
दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अहवालही आज पॉझिटीव्ह आला. तो मुंबईतून पारनेरमधील निघोजमध्ये आला होता. तेथील शाळेत तो क्वॉरंटाईन होता.

 

 

Web Title: 6 corona found in the district during the day: 60 in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.