दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा, जामखेडमध्ये सर्वाधिक तर कोपरगावात सर्वात कमी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:33 PM2019-10-21T12:33:43+5:302019-10-21T12:35:04+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा मतदारसंघात सर्वाधिक २२ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी कोपरगाव मतदारसंघात ९.८४ टक्के मतदान झाले होेते.

By 5.30 pm, Nevasa, Jamkhed have the highest voter turnout in Kopargaon. | दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा, जामखेडमध्ये सर्वाधिक तर कोपरगावात सर्वात कमी मतदान

दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा, जामखेडमध्ये सर्वाधिक तर कोपरगावात सर्वात कमी मतदान

Next

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा मतदारसंघात सर्वाधिक २२ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी कोपरगाव मतदारसंघात ९.८४ टक्के मतदान झाले होेते.
कर्जत जामखेड मतदार संघातही मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. या मतदारसंघात दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २०.८० टक्के मतदान झाले  होते. अकोले मतदारसंघात १३.५०, संगमनेर मतदारसंघात ११.८७ टक्के, शिर्डी मतदारसंघात १७.२६ टक्के, श्रीरामपूर मतदारसंघात ११.३२ टक्के, शेवगाव मतदारसंघात ११.७८ टक्के, राहुरी मतदारसंघात १०.८६ टक्के, पारनेर मतदारसंघात १५.५० टक्के, अहमदनगर शहर मतदारसंघात १०.२५ टक्के, श्रीगोंदा मतदारसंघात १२.६० टक्के मतदान झाले होते. 

Web Title: By 5.30 pm, Nevasa, Jamkhed have the highest voter turnout in Kopargaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.