शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील राष्ट्रवादीच्या ४२ जणांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 7:30 PM

पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या राष्ट्रवादीच्या ४२ कार्यकर्त्यांना गुरूवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला.

ठळक मुद्देप्रत्येकी पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या राष्ट्रवादीच्या ४२ कार्यकर्त्यांना गुरूवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तेथे तोडफोड करत जगताप यांना पळवून नेले. या प्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह इतर ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात पोलिसांनी ४४ जणांना अटक केली होती. या सर्वांना जामीन मंजूर झाला आहे. तोडफोडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. २० रोजी संदीप जाधव याला अटक केली होती, तर सोमवारी (दि. २१) या गुन्ह्यातील ४१ जण स्वत:हून हजर झाले. न्यायालयाने या सर्वांना दि. २४ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली होती.पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरूवारी या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कविता नावंदर यांच्यासमोर हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड़ महेश तवले यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. तो मंजूर करीत न्यायालयाने प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जामिनावर सर्वांची सुटका केली.जामीन मिळालेल्या कार्यकर्त्यांची नावेमाजी उपमहापौर दीपक सूळ, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, समद खान, आरिफ शेख, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव ढाकणे, आ. संग्राम जगताप यांचा स्वीय सहायक सुहास शिरसाठ, माजी नगरसेवक निखिल वारे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, माजी नगरसेवक अरविंद शिंदे, महेश बुचडे, केरप्पा हुच्चे, सय्यद अब्दुल वाहिद अब्दुल हमीद, सय्यद शादाब इलियास, अशोक रोकडे, आवी इराबत्तीन, सागर शिंदे, धीरज उर्किडे, सुनील त्रिंबके, बबलू सूर्यवंशी, सय्यद मन्सूर मुनीर, सुरेश मेहतानी, सय्यद मतीन खॉजा, प्रकाश भागानगरे, कुलदीप भिंगारदिवे, दत्तात्रय तापकिरे, बीर ऊर्फ दिलदार सिंग अजय सिंग शिख, फारूक अब्दुल अजीज रंगरेज, चंद्रकांत महादेव औशिकर, सत्यजित ढवणे, वैभव जाधव, राहुल शर्मा, मयूर बांगरे, किरण पिसोरे, घनश्याम बोडखे, बाबासाहेब जपकर, राजेंद्र ससे, वैभव दारूणकर, अक्षय डाके, मयूर कुलथे, संदीप रोकडे, संदीप जाधव.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडNCPराष्ट्रवादी काँग्रेस