नेवासा तालुक्यात तीन दिवसात आढळले २९१ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:20 AM2021-04-16T04:20:58+5:302021-04-16T04:20:58+5:30

नेवासा : शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसात २९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे. ...

291 coronaviruses found in three days in Nevasa taluka | नेवासा तालुक्यात तीन दिवसात आढळले २९१ कोरोनाबाधित

नेवासा तालुक्यात तीन दिवसात आढळले २९१ कोरोनाबाधित

googlenewsNext

नेवासा : शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसात २९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे. अशातच कोरोना खेडेगावात व वस्त्यावर पोहोचला आहे. गुरुवारी तालुक्यातील ३२ गावांमध्ये १३१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यातील अवघ्या १५ दिवसामध्ये तालुक्यातील ७० ते ८० गावांना कोरोनाने विळखा घातला. मागील १५ दिवसात हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या नेवासा खुर्द येथे ४० कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर गुरुवारी २६ कोरोनाबाधितांची वाढ झाली. सोनई, भेंडा बुद्रुक या प्रमुख गावासह ग्रामीण भागातही सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत. १५ एप्रिलअखेर तालुक्यातील रुग्णसंख्या ४ हजार ५८२ इतकी झाली आहे. त्यातील ५१६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. चार हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गुरुवारी तालुक्यातील नेवासा खुर्द, माळीचिंचोरा, खरवंडी, नारायणवाडी, घोडेगाव, उस्थळ दुमाला, अंमळनेर, खडका या गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले.

Web Title: 291 coronaviruses found in three days in Nevasa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.