पावसामुळे जिल्ह्यात ४७५ कोटींचे नुकसान; मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 04:36 PM2019-11-16T16:36:50+5:302019-11-16T16:37:13+5:30

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतकºयांना याचा फटका बसला आहे.

 2 crores of damage to the district due to rain; Waiting for help | पावसामुळे जिल्ह्यात ४७५ कोटींचे नुकसान; मदतीची प्रतीक्षा

पावसामुळे जिल्ह्यात ४७५ कोटींचे नुकसान; मदतीची प्रतीक्षा

Next

अहमदनगर : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क््यांपेक्षा जास्त आहे. जिरायत, बायागत पिकांसह फळपिकांचा यात समावेश आहे. 
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ८०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडूंब भरली असून शेतक-यांच्या शेतातील पाणी पंधरा दिवसांपासून साचल्याने सर्वच खरीप व काही रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिके व फळपिकांच्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.  कृषी विभाग व महसूल विभागाने गेल्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले. 
एकूण ४ लाख ५४ हजार १२ हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात २१ लाख ६५ हजार हेक्टर जिरायत, २२ लाख ११ हजार हेक्टर बागायत, तसेच १६ हजार २२६  हेक्टरवर फळपिक क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक फटका पाथर्डी (६१ हजार ७८१ हेक्टर) व शेवगावमध्ये (५९ हजार ७०५) बसला आहे. 
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा कृषी कार्यालयाच्या सहीनंतर ४७५ कोटी रूपये नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त व तेथून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. नवीन सरकार केव्हा स्थापन होईल, हे निश्चित नाही. अशा स्थितीत शेतक-यांना ही नुकसान भरपाई कधी मिळते, याकडे शेतक-यांचे डोळे लागले आहेत. 
अंतिम आकडेवारीनुसार नुकसानीचा आढावा (तालुका-शेतकरी संख्या-क्षेत्र)
नगर-३४९२२-२१७३१, पारनेर-४०९२४-२२२१६, पाथर्डी -८३३३५-६१७८१, कर्जत-३६१४०-२६७५३, श्रीगोंदा-४७३७० -३१६४८, जामखेड-१११२४-५२१५, श्रीरामपूर-३१८०६-२९४७२, राहुरी -४२३९४-३०९८२, नेवासा-५६१०३ -४५२२२, शेवगाव ७३७७८-५९७०५, संगमनेर-६०३१६-३७१९८, अकोले-५९०५५-२८३९९, कोपरगाव-४००२२ -३२३२६,राहाता-१८७७७ -२१३५८. असे एकूण ६३६१४६ शेतक-यांच्या ४५४०१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

Web Title:  2 crores of damage to the district due to rain; Waiting for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.