बुधवारी १७६ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:26 AM2021-02-25T04:26:44+5:302021-02-25T04:26:44+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी १७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. सध्या ८९८ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका दिवसात ...

176 new corona affected on Wednesday | बुधवारी १७६ नवे कोरोनाबाधित

बुधवारी १७६ नवे कोरोनाबाधित

Next

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी १७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. सध्या ८९८ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११४ आणि अँटीजेन चाचणीत १३ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (५४), कोपरगाव (८), नगर ग्रामीण (१०), पारनेर (१०), शेवगाव (९), मिलिटरी हॉस्पिटल (२), अकोले (५), कर्जत (३), कोपरगाव (९), पाथर्डी (५), राहाता (१०), राहुरी (७), संगमनेर (३१),श्रीगोंदा (४), श्रीरामपूर (२), नेवासा (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ९४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. मंगळवारी एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ११२९ इतकी होती. ती आता ११३२ इतकी झाली आहे. त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ७४ हजार ९७३ इतकी झाली आहे.

Web Title: 176 new corona affected on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.