अहमदनगर जिल्ह्यात आज १५ नव्या रुग्णांची भर;  ८ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:46 PM2020-06-27T12:46:40+5:302020-06-27T12:47:48+5:30

अहमदनगर जिल्ह्यात आज (२७ जून) पुन्हा नव्या १५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान ८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहे. यात नगर शहरातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

15 new patients added in Ahmednagar district today; 8 patients overcome corona | अहमदनगर जिल्ह्यात आज १५ नव्या रुग्णांची भर;  ८ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर जिल्ह्यात आज १५ नव्या रुग्णांची भर;  ८ रुग्णांची कोरोनावर मात

Next

अहमदनगर : जिल्ह्यात आज (२७ जून) पुन्हा नव्या १५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान ८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहे. यात नगर शहरातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्यातील संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २७३ झाली आहे. 

 शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने १५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या ही १११ झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात ६ बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नालेगाव ३, आडते बाजार १, तारकपूर १ आणि तोफखाना १ असे रुग्ण आढळले आहेत. यातील तारकपूर येथील रुग्ण हा भोपाळ येथून प्रवास करून आला होता.

 याशिवाय, श्रीगोंदा तालुका ३, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी १ आणि  राहाता तालुक्यात २ कोरोनाबाधित आढळले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील बाधित आढळलेल्या व्यक्ती भिवंडी येथून प्रवास करून आल्या होत्या, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.


 दरम्यान, जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या आता १११ झाली असून एकूण नोंद रुग्ण संख्या ३९७ इतकी झाली आहे. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 15 new patients added in Ahmednagar district today; 8 patients overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.