शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

जेऊर सोसायटीत १ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार : २८ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 5:39 PM

नगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये १ कोटी १८ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार आढळून आल्याने सचिवांसह संस्थेच्या आजी- माजी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये १ कोटी १८ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार आढळून आल्याने सचिवांसह संस्थेच्या आजी- माजी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर रकमेचा भरणा न केल्याचे लेखा परिक्षणामध्ये आढळून आले. लेखा परिक्षक प्रकाश शिवाजी गडाख यांच्या फिर्यादी वरून अजय बाळासाहेब पटारे, मारुती सिताराम तोडमल, सुभद्रा पोपट म्हस्के, रंगनाथ शंकर बनकर, रामचंद्र चिमाजी धनवडे, दत्तात्रय शंकर मगर, विश्वनाथ मल्हारी शिंदे, साहेबराव अनिलराव वाघ, भरत अनुश्री तोडमल, लक्ष्मण गजाराम तोड मल, दिलीप एकनाथ ससे, ताराबाई मगर, विजय आनंदा पाटोळे, शिवाजी संतू तवले, मच्छिंद्र एकनाथ ससे, बाबासाहेब निवृत्ती शिंदे, अनिल ज्ञानदेव तोडमल, पांडुरंग सोपान तवले, अंबादास म्हस्के, ज्ञानदेव तुकाराम गोरे, बालाजी मनोहर पाटोळे, सुनिता पोपट घुगरकर, अरुण भानूदास तोडमल, चिमाजी पांडुरंग धनवडे, एन.एल धनवळे, ए.सी पाटोळे, टि.जे सिनारे, आर.जे मनतोडे आदी २८ जणाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विनोद चव्हाण करत आहे.भरणा न करता लंपासजेऊर सोसायटीच्या कर्जदार सभासदांचे कर्जाच्या हप्ते पोटी भरणा केलेली रक्क १ कोटी १८ लाख ५४ हजार १४५ रुपये सचिवांनी बँकेत न भरता सदर रक्केचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासगत वषार्पासून जेऊर सोसायटीत गैरव्यवहाराच्या मुद्यावरुन गाजत आहे. दरम्यान उपनिबंधक यांनी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सदर प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर