झोडगे यांनी वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्ते पोहोचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:39+5:302021-03-06T04:20:39+5:30
निंबळक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शरद झोडगे यांनी नागरदेवळे गटामध्ये दर्जेदार कामे केली. शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी वाड्या-वस्त्यांपर्यंत ...

झोडगे यांनी वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्ते पोहोचविले
निंबळक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शरद झोडगे यांनी नागरदेवळे गटामध्ये दर्जेदार कामे केली. शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी वाड्या-वस्त्यांपर्यंत डांबरीकरणाचे रस्ते केले, असे प्रतिपादन शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.
शहापूर (ता.नगर) येथील दत्त मंदिरासमोर रस्त्याच्या कामाचा प्रारंभ गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गाडे म्हणाले, ‘नागरदेवळे गट विकासाकामापासून वंचित होता. खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर रस्ते नव्हते. चार वर्षांमध्ये झोडगे यांनी गटामध्ये शासनाच्या सर्व योजना पोहोचविल्या व त्याचा लाभ मिळवून दिला.’
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सरपंच देवराम भालसिंग, मच्छिंद्र कराळे, छगन लगड, भाऊसाहेब बेरड, नारायण धाडगे, सदाशिव धाडगे, विलास शेडाळे, रामभाऊ लगड, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब राऊत उपस्थित होते.
---
०५ शहापूर
शहापूर येथे रस्ता कामाचा प्रारंभ करताना प्रा. शशिकांत गाडे.