शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे टँकर बंद केल्याने जि.प. अध्यक्षा संतप्त

By admin | Updated: August 5, 2016 23:43 IST

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही.

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यात शासनाने जिल्ह्यातील पाण्याचे टँकर बंद केले आहेत. ग्रामीण भागात यामुळे पाणीबाणी निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना त्यांनी पत्र दिले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने पाण्याचे टँकर सुरू होते. उन्हाळ्यात हा आकडा ७५० च्या पुढे गेला होता. दरम्यान, जुलै महिन्यात झालेले पावसाने जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची संख्या ३०५ पर्यंत खाली आली होती. शासनाने ३० जून ते २१ जुलैपर्यंत पाण्याचे टँकर सुरू ठेवण्यास मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर शासनाने जिल्ह्यात सर्वत्र पिण्याचे पाणी उपलब्ध झाले की नाही, याची खातरजमा न करताच पाण्याचे सर्व टँकर बंद केले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भू गर्भातील पाणीसाठा न वाढल्याने पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अध्यक्षा गुंड संतप्त झाल्या असून त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. यात त्यांनी तातडीने शासनाला अहवाल देवून पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय सुरू असणारे टँकरपारनेर ८७, श्रीगोंदा ७५, कर्जत ४५, संगमनेर ३९, नगर ३०, जामखेड २०, नेवासा ३, राहाता ३, राहुरी २, पाथर्डी १ यांचा समावेश आहे. शासन पाण्याचे टँकर सुरू करतांना तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना संयुक्त पाहणी करण्यास सांगते. मग बंद करतांना या दोघांनी एकत्र पाहणी करून टँकर बंद करावेत, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.