जिल्हा परिषदेच्या सभा ऑनलाइनऐवजी आता पूर्वीप्रमाणेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:18+5:302020-12-16T04:36:18+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा प्रत्यक्ष सभागृहात न घेता ऑनलाइन आयोजित करण्याबाबत शासनाने जिल्हा परिषदांना सुचविले होते. ...

Zilla Parishad meetings are now online instead of online | जिल्हा परिषदेच्या सभा ऑनलाइनऐवजी आता पूर्वीप्रमाणेच

जिल्हा परिषदेच्या सभा ऑनलाइनऐवजी आता पूर्वीप्रमाणेच

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा प्रत्यक्ष सभागृहात न घेता ऑनलाइन आयोजित करण्याबाबत शासनाने जिल्हा परिषदांना सुचविले होते. त्याप्रमाणे गेल्या सात ते आठ महिने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा, स्थायी सभा किंवा इतर विषयांच्या सभा ऑनलाइन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केल्या. मात्र, आता लॉकडाऊनच्या काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत झाले आहे. तसेच अनेक दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्स सभांना, बैठकांना अडचणी येत होत्या. या सर्व बाबी लक्षात घेता शासनाने आता यापुढील सभा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणेच सभागृहात घेण्याची परवानगी दिली आहे. १५ डिसेंबर रोजी ग्रामविकास विभागाने तसे पत्र सर्व जिल्हा परिषदांना दिले आहे.

--------------

जिल्हा परिषद, पंचायत समिती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा व विविध विषय समित्यांच्या सभा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पूर्वीप्रमाणे घेण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे यापुढे कार्यवाही होईल.

- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जि. प.

Web Title: Zilla Parishad meetings are now online instead of online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.