रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षपदी झंवर, सचिवपदी रेळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:19+5:302021-07-02T04:15:19+5:30
वंचित, दुर्बल व गरजू घटकांचे जीवन बदलण्यासाठी या वर्षात रोटरी काम करणार असून, पदग्रहण सोहळ्यात या अनुशंगाने १५ अंध ...

रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षपदी झंवर, सचिवपदी रेळे
वंचित, दुर्बल व गरजू घटकांचे जीवन बदलण्यासाठी या वर्षात रोटरी काम करणार असून, पदग्रहण सोहळ्यात या अनुशंगाने १५ अंध व्यक्तींच्या कुटुंबीयांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी रोटरीचे सहायक प्रांतपाल मनिष नय्यर व माजी सहायक प्रांतपाल अॅड. अभय राजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी प्रियदर्शनीच्या माजी अध्यक्षा गिला गिल्डा यांनी झंवर यांच्याकडे पदाची सूत्रे बहाल केली.
पंधरा अंध व्यक्तींच्या कुटुंबीयांना अन्न-धान्य व किराणा किट वाटप उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख खजिनदार प्रतिभा धूत या होत्या. पंधरा अंध लाभार्थींच्या कुटुंबीयांची निवड मिशन फॉर द ब्लाइंड ऑर्गनायझेशनचे मनोज तायडे यांनी केली. रोटरी प्रियदर्शनीच्या सदस्या म्हणून प्रतिभा धूत, आशा फिरोदिया, डॉ. बिंदू शिरसाठ, कुंदा हलबे, यास्मीन जरीवाला, कविता काणे, जागृती ओबेरॉय, स्विटी पंजाबी, नीना मोरे, माधुरी झंवर, रिटा झंवर, डॉ. स्मिता तारडे, सुरेखा मनियार, शीतल गायकवाड, प्रभा खंडेलवाल यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन सहसचिव निलमणी गांधी यांनी केले.
..................
०१ रोटरी
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्षपदी शशी झंवर व सचिवपदी देविका रेळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे पदभार सोपविताना माजी अध्यक्षा गिला गिल्डा. समवेत मनिष नय्यर, अॅड. अभय राजे. (छाया-वाजिद शेख-नगर)