तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 00:35 IST2016-04-18T00:23:21+5:302016-04-18T00:35:13+5:30
निंबळक : मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या गणेश अशोक ढवळे (वय १८, रा. नगर) या तरुणाचा निंबळक येथील तलावात बुडून मृत्यू झाला.

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
निंबळक : मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या गणेश अशोक ढवळे (वय १८, रा. नगर) या तरुणाचा निंबळक येथील तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मयत तरुणावर रविवारी रात्री अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
नगर तालुक्यातील सर्व तलाव, विहिरीचे पाणी आटलेले आहे. मात्र निंबळककरांना वरदान ठरलेल्या या तलावात चांगले पाणी आहे. त्यामुळे अनेक तरुण रोज या तलावात पोहण्यासाठी जातात. तलाव हा खोल असून तलावाच्या चारही बाजूंनी कपारी आहेत. चिखल आणि गाळ मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. त्याच्यावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गणेश ढवळे हे वृत्तपत्र छायाचित्रकार श्रीकांत वंगारी यांचे मेव्हुणे होते. गेल्या तीन महिन्यात तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा तलाव पोहण्यासाठी बंद करण्याची मागणी होत आहे.