विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:42 IST2017-08-23T13:42:38+5:302017-08-23T13:42:38+5:30
मोहटे गावातील हरिदास सतुबा दहिफळे या युवकाचा विद्युत पोलच्या तानात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला आहे.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
प थर्डी : तालुक्यातील मोहटे गावातील हरिदास सतुबा दहिफळे या युवकाचा विद्युत पोलच्या तानात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला आहे. ३४ वर्षे वय असलेल्या दहिफळे याने संगणक क्षेत्रात डीपोल्मा पर्यंत शिक्षण घेतले होते. मंगळवारी दुपारी बारा वाजता तो शेतात गेला होता. शेतात बक-या सांभाळत असतांना शेतातील विद्युत पोलच्या तानामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याचे हरीदासच्या लक्षात आले नाही त्यामुळे विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने हरिदास तारीलाच चिकटून राहिला. ब-याच वेळाने शेळ्या सांभाळणा-या सहकारी मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आरडओरड केला. त्यामुळे आजबाजूच्या ग्रामस्थांनी काठीच्या सहाय्याने हरिदासला दूर केले. त्यास तातडीने पाथर्डी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.