कोहोकडीत बिबट्याने केले युवकाचे अपहरण, पोलीस-वन विभागाच्या वतीने शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:53 IST2020-06-15T13:52:55+5:302020-06-15T13:53:42+5:30

पारनेर-तालुक्यातील कोहोकडी येथील सतिश सुखदेव गायकवाड ( वय 27) या युवकाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस, वन विभागाच्यावतीने शोध मोहीम सुरू असून सोमवारी दुपारपर्यत तपास लागलेला नाही.

A youth was abducted by a leopard near Kohok | कोहोकडीत बिबट्याने केले युवकाचे अपहरण, पोलीस-वन विभागाच्या वतीने शोध सुरू

कोहोकडीत बिबट्याने केले युवकाचे अपहरण, पोलीस-वन विभागाच्या वतीने शोध सुरू

पारनेर-तालुक्यातील कोहोकडी येथील सतिश सुखदेव गायकवाड ( वय 27) या युवकाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस, वन विभागाच्यावतीने शोध मोहीम सुरू असून सोमवारी दुपारपर्यत तपास लागलेला नाही.

कोहोकडी येथील सतिष सुखदेव गायकवाड हा युवक रविवारी रात्री शिरूर येथून कोहोकडी फाटा येथे आला होता. त्यानंतर तो घरी आला नाही म्हणून त्यांच्या कुटुंबातील लोकानी पोलिसांना फोन केला. ही माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी,भालचंद्र दिवटे यांच्या सह पोलिस घटनास्थळी आले. यावेळी त्यांनी शोध घेतला असता कोहोकडी फाट्याजवळ पोलिसांना सतिशची गाडी रोडच्या कडेला पडलेली दिसली. त्या ठिकाणी बिबट्याचे पंजाचे निशाणा दिसून आले. थोड्या अंतरावर त्याचा बूट पडलेला दिसला. त्या ठिकाणाहून थोड्या अंतरावर त्याचा मोबाईल चालू अवस्थेत मिळून आला. बुटा शेजारी जमिनीवर देखील बिबट्याच्या पायाचे ओरखडे दिसत होते. पोलिसांनी वन विभागास बोलावून घेऊन रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली आहे.

Web Title: A youth was abducted by a leopard near Kohok