युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:42+5:302021-07-21T04:15:42+5:30
महांकाळ वाडगाव गावातील एका खाजगी सावकाराकडे संबंधित तरुणाने जमीन गहाण ठेवून शेतीसाठी १३ लाख ५० हजार रुपये प्रति शेकडा ...

युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
महांकाळ वाडगाव गावातील एका खाजगी सावकाराकडे संबंधित तरुणाने जमीन गहाण ठेवून शेतीसाठी १३ लाख ५० हजार रुपये प्रति शेकडा पाच रुपये टक्क्याने व्याजाने घेतले होते. घेतलेल्या पैशांची हा तरुण व्याजासह परतफेड करीत असताना संबधित खाजगी सावकाराच्या मुलाने तरुणाला येथील रेल्वे उड्डाणपुलासमोर गाठून आमच्या विरोधात पोलिसाकडे तक्रार का करतो, अशी विचारणा करीत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तरुणाला तातडीने येथील कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस नाईक संजय दुधाडे यांनी दिली.