प्रतापपूर शिवारात बिबट्याचा हल्ल्यात युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:36 IST2020-06-24T15:35:55+5:302020-06-24T15:36:50+5:30

संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने दुचाकीवरुन चाललेल्या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२३ जून) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

Youth seriously injured in leopard attack in Pratappur Shivara | प्रतापपूर शिवारात बिबट्याचा हल्ल्यात युवक गंभीर जखमी

प्रतापपूर शिवारात बिबट्याचा हल्ल्यात युवक गंभीर जखमी

आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने दुचाकीवरुन चाललेल्या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२३ जून) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

 सादिक फकिरमंहम्मद शेख (वय २३, रा. माळेवाडी, ता. संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. 

मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास सादिक फकिरमंहम्मद शेख हे चुलते अहमद हुसेन शेख यांना सोडविण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरुन चालले होते. यावेळी प्रतापपूर शिवारातील चतुरे वस्तीलगत रस्त्याच्या कडेला अंधारात बिबट्याचे पिल्लू दोघांना नजरेस पडले. त्यामुळे घाबरलेल्या सादिक व हुसेन यांनी दुचाकी थांबवून बिबट्याच्या पिल्लाचा मागोवा घेतला. दुचाकी थांबल्याचे पाहून उजेडामुळे पिल्लू अंधारात निघून गेले. 

सादिक व हुसेन शेख यांनी तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते शंभर फुटावर गेल्यानंतर अंधारात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्या दुचाकीवर झेप घेतली. त्यामुळे सादिक व अहमद शेख खाली कोसळले. यावेळी बिबट्याने सादिक याला चावा घेतला आहे. आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. सादिक यास अहमदनगर येथे रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. 
 

Web Title: Youth seriously injured in leopard attack in Pratappur Shivara