कोयत्याने वार करून अकोळनेर येथे तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 10:47 IST2019-04-04T10:43:53+5:302019-04-04T10:47:35+5:30

अहमदनगर : नगर तालुक्यातील अकोळनेर येथे अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला. बुधवारी रात्री ९ ...

Youth murder in Akolner killed by accident | कोयत्याने वार करून अकोळनेर येथे तरुणाचा खून

कोयत्याने वार करून अकोळनेर येथे तरुणाचा खून

अहमदनगर : नगर तालुक्यातील अकोळनेर येथे अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दिनेश गोरख दिवटे (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेश हा बुधवारी रात्री नऊ वाजता त्याच्या घराजवळ उभा होता. याचवेळी चेह-याला रुमाल बांधलेले मोटारसायकलवरून चार हल्लेखोर आले. त्यांनी अचानक दिनेश याच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने दिनेश याला काहीच प्रतिकार करता आला नाही. अंगावर गंभीर वार झाल्याने रक्तस्त्राव होऊन दिनेश याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून हल्लेखोर तत्काळ फरार झाले. ही घटना समजताच ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली़. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करत घटनेची नोंद केली. या घटनेने अकोळनेर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी नगर तालुका परिसरात पथके रवाना केली आहेत. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

Web Title: Youth murder in Akolner killed by accident