महापारेषणचा खांब अंगावर पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST2021-09-11T04:23:05+5:302021-09-11T04:23:05+5:30
जामखेड : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जामखेड तालुक्यातील चुंबळी गावात धक्कादायक घटना घडली आहे. महापारेषणचा खांब अंगावर पडल्याने आनंद ...

महापारेषणचा खांब अंगावर पडून युवकाचा मृत्यू
जामखेड : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जामखेड तालुक्यातील चुंबळी गावात धक्कादायक घटना घडली आहे. महापारेषणचा खांब अंगावर पडल्याने आनंद प्रभाकर हुलगुंडे (वय २५, रा. चुंबळी, ता. जामखेड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
जामखेडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपरिषद हद्दीतील चुंबळी येथील शिवारातून जाणारी महापारेषणची टाॅवर विद्युत वाहिनी आहे. आष्टी १३२ केव्ही ते खर्डा १३२ केव्ही जोडणारी वीज वाहिनी आनंद हुलगुंडे यांच्या शेतातून जाते. मात्र महापारेषणने हुलगुंडे यांना ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे पैसे दिले नाहीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमच्या शेतात तो टाॅवर नको, असे हुलगुंडे म्हणत होते. रात्रीच्या वेळी दोन ते अडीचच्या आसपास टाॅवरमधील काही खांब हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्यावर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.
----
आष्टी १३२ केव्ही ते खर्डा १३२ केव्ही यांना जोडणारी महापारेषणची टाॅवर विद्युत वाहिनी चुंबळी येथून जाते. प्रभाकर हुलगुंडे यांना पिकाचे नुकसान म्हणून टाॅवर बद्दल तीन लाख सहा हजार रूपयांचा धनादेश दिलेला आहे. आमचे कामही पूर्ण झालेले आहे. मात्र रात्रीच्या वेळी आनंद हुलगुंडे यांनी टाॅवरचे सपोर्ट कापले. त्यामुळे टाॅवर एका बाजूला कलला व तो हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
-संतोष चव्हाण
कार्यकारी अभियंता, महापारेषण
100921\1748-img-20210910-wa0047.jpg
??? ???? ????