केलवड गावातील तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:05 IST2018-04-03T14:04:16+5:302018-04-03T14:05:47+5:30

राहाता तालुक्यातील केलवड गावातील शाम उर्फ राहुल साहेबराव जटाड (वय २३) या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयताच्या घराशेजारील शरद राधुजी गमे यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला.

youth death in Kelavad village due to drowning | केलवड गावातील तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

केलवड गावातील तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अस्तगाव : राहाता तालुक्यातील केलवड गावातील शाम उर्फ राहुल साहेबराव जटाड (वय २३) या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयताच्या घराशेजारील शरद राधुजी गमे यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला. मध्यरात्री उशिरा शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
शरद गमे यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार हेडकॉँस्टेबल शेख, राहाता पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुभाष गमे, केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे, अंजाबापू जटाड आदी मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीन रुग्णालयात पाठविण्यात आला. ३१ मार्चला शनिवारी तो बेपत्ता झाल्याची तक्रार राहाता पोलिसांत दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचा शोध घेण्यास सुरूवात झाली. परंतु त्याचा कुठेही तपास लागला नाही. त्यानंतर सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: youth death in Kelavad village due to drowning