प्रेमाला विरोध केल्याने युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 13:12 IST2020-06-28T13:11:38+5:302020-06-28T13:12:51+5:30
श्रीगोंदा शहराजवळील औटीवाडी येथील एका युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.

प्रेमाला विरोध केल्याने युवकाची आत्महत्या
श्रीगोंदा : शहराजवळील औटीवाडी येथील एका युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
राहुल सखाराम औटी (वय २२, रा. औटेवाडी, श्रीगोंदा), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहुल औटी हा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षांपासून शेती व लिंबू व्यवसाय करीत होता. जामखेड तालुक्यातील एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधाला मुलीच्या नातेवाईकांचा विरोध होता. भविष्यात लग्नालाही विरोध होईल, असे त्याला वाटत होते.
दरम्यान, लांडगेवस्ती येथील काहींनी फोनद्वारे त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी, असे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. शनिवारी (दि.२७) पहाटे पाचच्या सुमारास युवकाने घराजवळ असलेल्या मराठी शाळेच्या अंगणातील झोपाळ्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे.