गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: May 28, 2017 18:22 IST2017-05-28T18:22:57+5:302017-05-28T18:22:57+5:30
आश्वी खुर्द येथे घरासमोरील झाडास गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
आश्वी (अहमदनगर), दि़ २८ - : आश्वी खुर्द येथे घरासमोरील झाडास गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. जगन्नाथ साहेबराव मेंगाळ (वय ३४) या तरुणाने शनिवारी रात्री आठ वाजण्याचा सुमारास घराशेजारील झाडास उपरण्याचा साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्तेचे निश्चित कारण समजले नाही. परंतु त्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. जगन्नाथ साहेबराव मेंगाळ यांची निळवंडे धरणात जमीन गेल्याने त्यांना आश्वी खुर्द येथे तीन एकर जमीन शासनाकडून देण्यात आली आहे. मेंगाळ शेती व मोलमजुरीचे काम करुन उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.