शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवत दिली लग्नाची धमकी; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:14 IST

गेल्या आठ वर्षांपासून आरोपी तरुणीच्या मागे होता मात्र रविवारी त्याने हद्दच केली.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या आठ वर्षापासून पाठलाग करून आरोपी तरुणीला त्रास देत होता. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ओंमकार ज्ञानेश्वर सुपेकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना २०१७ मध्ये तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. मित्र समजून ती त्याच्याशी बोलत होती. त्यानंतर २०२०मध्ये त्याने फोन करून लग्नासाठी मागणी घातली. तिने लग्नास नकार दिला. त्याचा त्याला राग आला. त्याने तरुणीला शिवीगाळ करत दमदाटी केली, तसेच घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तरुणीने त्याचा मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टला टाकला, तरीही तो तिला त्रास देत होता. दुसऱ्यांच्या फोनवरून धमकावत होता. ही बाब तिने घरच्यांना सांगितली. नातेवाइकांनी त्याच्या आई-वडिलांना समजावून सांगितले. त्यांनीही यापुढे असे होणार नाही, अशी खात्री दिली. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने ती क्लासला जात होती. २०२३ मध्ये त्याने तिला क्लासच्या समोर गाठले व दुचाकीची चावी घेऊन त्रास दिला. तेव्हापासून तो तिला त्रास देत होता. रविवारी त्याने पुन्हा पीडितेला गाठले आणि हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवत लग्न कर, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Threat of marriage with pistol photo: Shocking incident with student.

Web Summary : A student preparing for competitive exams in Ahilyanagar was threatened with marriage and shown a pistol photo by a stalker. The accused had been harassing her for eight years. Police have registered a case.
टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारी