नेवासा फाटा येथे ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:33 IST2017-12-27T18:33:12+5:302017-12-27T18:33:14+5:30
उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

नेवासा फाटा येथे ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण जागीच ठार
नेवासा फाटा : उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
शामुल प्रेमदास कणगरे (वय ५५, रा.मुकिंदपूर ता.नेवासा) हे मृताचे नाव आहे. हा ट्रॅक्टर नेवासा फाट्याकडे जात होता. यावेळी रस्त्याने जात असलेले कणगरे टँक्टर ट्रॉलीखाली चिरडून जागीच ठार झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.