डॉक्टरच्या हलगर्जीमुळे तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:46+5:302021-06-05T04:15:46+5:30
अमदनगर : उपचारादरम्यान डॉक्टरकडून हलगर्जीपणा झाल्याने तरुण रुग्णाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भोसले हॉस्पिटलमधील डॉ. ...

डॉक्टरच्या हलगर्जीमुळे तरुणाचा मृत्यू
अमदनगर : उपचारादरम्यान डॉक्टरकडून हलगर्जीपणा झाल्याने तरुण रुग्णाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भोसले हॉस्पिटलमधील डॉ. रवींद्र भोसले यांच्याविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बुधवारी (दि.२) (कलम ३०२-अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉस्टेबल गणेश भगवान नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे.
नगर तालुक्यातील वाकोडी येथील तरुण योगेश सुरेश भोसले (वय २९) याला १८ डिसेंबर २०१८ रोजी शहरातील सक्कर चौक येथील डॉ. भोसले हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २० डिसेंबर २०१८ रोजी योगेश भोसले याचा मृत्यू झाला होता. यावेळी भिंगार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत मयताच्या नातेवाइकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती. दरम्यान योगेश भोसले याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची तपासी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली. याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी १ जून रोजी दिलेल्या अहवालात उपचारादरम्यान हलगर्जी झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे नमूद असल्याने डॉ. भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक बेंडकोळी हे पुढील तपास करत आहेत.