शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीतील येडगाव धरण ओव्हरफ्लो;  डिंबे,  घोड  धरणेही भरणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:18 IST

कुकडी प्रकल्पातील साडेतीन टीएमसी क्षमतेचे येडगाव धरण गुरुवारी रात्री ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीपात्रात ५२२ क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड धरण आता काही तासातच भरू शकते.

श्री गोंदा : कुकडी प्रकल्पातील साडेतीन टीएमसी क्षमतेचे येडगाव धरण गुरुवारी रात्री ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीपात्रात ५२२ क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड धरण आता काही तासातच भरू शकते.     कुकडी प्रकल्पात सरासरी ६० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा ३१ टक्के कमी उपयुक्त पाणीसाठा  आहे. यामध्ये माणिकडोह पिंपळगाव जोगेमधील पाणीसाठा चिंतेची बाब आहे. 

 येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  ७०२ मिलिमीटर  इतका एकूण पाऊस नोंदविला गेला आहे. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४९३ मिलिमीटर इतका पाऊस नोंदविला गेला आहे. धरणात ३ हजार ४७९ एमसीएफटी ३४ टक्के  इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

वडज धरण चार दिवसापूर्वी ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीत ७५२ क्युसेकने विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रात ३४२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. 

घोड नदीवरील डिंबे धरण ८४ टक्के भरले आहे. धरणात १० हजार  ७४ एमसीएफटी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण २४ तासात  ओव्हरफ्लो  होण्याची शक्यता आहे.  पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात ७८७ मिलिमीटर इतका पाऊस  पडला आहे. मात्र धरणात अवघा २० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पात १६ हजार ६७४ एमसीएफटी पाणीसाठा आहे. म्हणजे ६० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा २७ हजार ७५ एमसीएफटी म्हणजे ९१ टक्के होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसDamधरणWaterपाणी