नगरमध्ये रंगणार पुन्हा कुस्त्यांचा आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:11+5:302021-09-09T04:27:11+5:30
अहमदनगर कुस्ती प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण मंगळवारी पारनेर येथील श्रीशिवछत्रपती कुस्ती संकुलात अर्जुन ...

नगरमध्ये रंगणार पुन्हा कुस्त्यांचा आखाडा
अहमदनगर कुस्ती प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाणार आहे.
या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण मंगळवारी पारनेर येथील श्रीशिवछत्रपती कुस्ती संकुलात अर्जुन पुरस्कारप्राप्त काकासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, विजय गावडे, श्रीशिवछत्रपती कुस्ती संकुलाचे युवराज पठारे, धनंजय जाधव, महेश जाधव, नानासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, रामभाऊ नळकांडे आदी उपस्थित होते. जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून लांडगे यांनी महिला कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, उत्तर महाराष्ट्र केसरी आदी स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्या होत्या. कुस्ती दंगल स्पर्धाही त्यांच्याच संकल्पनेतून उतरली होती. सदर कुस्ती लीगमध्ये एकूण ६ संघ असतील. प्रत्येक संघात ५ मुले व १ महिला मल्ल असतील यासह १ परराज्यातील खेळाडू
प्रत्येक संघाची किंमत १० लाख. यातील ७ लाख रूपये खेळाडूंसाठी असतील.
--------------------------------
आतापर्यंत आजोबा पै. छबुराव लांडगे यांच्या प्रेरणेतून कुस्तीसाठी उपक्रम राबवत आलो आहे. नगरच्या मल्लांसाठी ही नवीन लीग घेऊन आलो आहोत. या स्पर्धेतून खेळाडूंना चार पैसे मिळतील. काॅर्पोरेट स्वरूप आले तरच कुस्ती टिकेल, राज्यात अशा लीग व्हाव्यात. कोणी पुढे न आल्यास आम्ही हा प्रयोग कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबवू.
- वैभव लांडगे, अध्यक्ष जिल्हा तालीम संघ, नगर.
फोटो ०८ कुस्ती
कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे उद्घाटन काकासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. वैभव लांडगे, गोरखनाथ बलकवडे, अशोक शिर्के, विजय गावडे, युवराज पठारे, धनंजय जाधव, महेश जाधव, नानासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप आदी.