राहुरी तालुक्याला सर्वाधिक फटका
By Admin | Updated: June 6, 2014 01:01 IST2014-06-06T00:03:28+5:302014-06-06T01:01:55+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाच्या दणक्यात ६२० घरांची पडझड झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राहुरी तालुक्याला सर्वाधिक फटका
अहमदनगर : जिल्ह्यात तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाच्या दणक्यात ६२० घरांची पडझड झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान राहुरी तालुक्यात झाले असून ४८८ घरांची पडझड झाली आहे. दरम्यान पावसामुळे झालेल्या बळींची संख्या ६ वर पोहचली आहे.
जिल्ह्यात रोहिणी नक्षत्रात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिली. २ जून पासून जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वारा, विजेचा कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली.अनेक ठिकाणी वादळाचा मोठा फटका नागरिकांना बसला. घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. महसूल विभागाकडून पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा आपत्ती कक्षाकडे प्राथमिक स्वरूपात माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात सुमारे ६२० घरांची पडझड झाली. २४ ठिकाणी घरे जमीनदोस्त झाली. त्यासोबत जिल्ह्यात १०१ मिलीमीटरच्या जवळपास पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला असून यामुळे खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)1
२ जूनला राहाता तालुक्यातील तेलवड मध्ये १० घरांचे नुकसान झाले असून ६ जनावरे जखमी झालेले आहेत. संगमनेर आणि शेवगाव या ठिकाणी प्रत्येक एक जीवित हानी झालेली आहे. यासह वादळात मोठ्या प्रमाणात झाडे पडलेले आहेत.
2३ जूनला जिल्ह्यात ५५० घरांची पडझड झाली असून यात श्रीगोंदा, शेवगाव, नगर या ठिकाणी प्रत्येकी २०, पाथर्डी ११ आणि राहुरी तालुक्यात ४८० घरांची पडझड झालेली आहे. तालुक्यात वादळात दोघांना प्राण गमवावे लागले असून तीन जनावरे जखमी झालेले आहेत. राहुरी, म्हैसगाव, दगडवाडी, चिखलठाण, ब्राम्हणी, वांबोरी, चेडगाव, उंबरे, मोकळहोळ, सोनगाव या ठिकाणी सर्वाधिक नुकसान झालेले आहे.
3४ जूनला श्रीगोंदा तालुक्यात एक जीवित हानी झाली असून १२ घरे, १ झोपडी, श्रीरामपूरला १६ घरे, २७ झोपड्या, राहुरीला ८ घरे, कर्जतला २५ घरांचे नुकसान झाले आहे. यासह या ठिकाणी फळबागा, शेत पिकांची नासाडी झालेली आहे.
4नेवाशात माळी चिंचोरे येथे ४ घरांचे नुकसान झाले आहे. चार तारखेला ७६ मिमी पाऊस झाला असून यात वांबोरी २५, जामखेड २४, श्रीगोंदा २३ आणि पारनेरला १२ मिमी पावसाची नोंद आहे.
१२ शाळांची पडझड
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसात झालेल्या वादळात जिल्हा परिषदेच्या वांबोरी केंद्र शाळेसह अन्य ठिकाणी ११ शाळांची पडझड झालेली आहे. येत्या १६ जूनला शाळा सुरू होणार असल्याने या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करण्यासाठी जिल्हाधिकारी कवडे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अर्थ संकल्पातही वादळग्रस्त शाळांच्या दुरूस्तीसाठी तरतूद करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. यात राहुरी तालुक्यातील दोघे, संगमनेर, शेवगाव, नगर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश होता. ५ जूनच्या अहवालात श्रीगोंद्यात अंगावर भिंत पडून एक महिलेचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तिसर्या दिवशीही पाऊस
अहमदनगर : शहरात सलग तिसर्या दिवशीही वादळी वार्यासह पाऊस झाला. गुरूवारी दिवसभर उकाड्यानंतर सायंकाळी आभाळ भरून आले होते. सातच्या सुमारास वादळी वार्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. साधारण अर्धा तास शहरात वादळी वारे वाहत होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस पडला. पाथर्डी तालुक्यातील तुकाई शिंगवे गावात वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)