शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पक्षाबाबत काळजी वाटतेय : कार्यकर्त्यांची विखेंकडे कबुली; भाजपमधून विखेंना वाढता विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 14:07 IST

डॉ. सुजय विखे दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरु झाला आहे. त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक असून, विखेंसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त केली.

अहमदनगर : डॉ. सुजय विखे दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरु झाला आहे. त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक असून, विखेंसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त केली.नगरजवळील विळद घाट येथील विखे यांच्या कार्यालयात डॉ. सुजय विखे यांनी निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत विखे म्हणाले, उद्या १२ वाजता पुढील चित्र स्पष्ट होईल. आपण सर्वजण मुंबईत जाणार आहोत़ मात्र, मुंबईत शक्तीप्रदर्शन करायचे नाही. एकाच गाडीत निवडक कार्यकर्त्यांसह मुंबईला जाणार आहे, असे विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.दरम्यान भाजपमध्ये गेल्यास पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त करीत भाजपचे वरिष्ठ नेते प्रचाराला येतील का, काही दगा तर होणार नाही ना, अशीही काळजी काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.विखे यांच्या प्रवेशाला भाजपमधूनच जोरदार विरोध सुरु झाला आहे. सोमवारी (दि.११) मुंबई येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध दर्शविला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

सोमवारी सकाळी मुबंई भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नगर दक्षिणमधून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध केला. यावेळी जेष्ठ नेते आसाराम ढुस, सुनील रामदासी, शांतीलाल कोपणार, बाळासाहेब सोनवणे, विक्रम तांबे, अनिल खिळे, बबनराव डावखर,कमलेश गांधी, विजय मंडलेचा, राजेंद्र मोटे, नंदकुमार कोकाटे, अरुण जगताप, डॉ सुनील गावडे, भीमराज सागडे, गोकुळ दौंड, सुनील परदेशी, किशोर बोरा, अनिल गीते आदींसह नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहुरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गांधी यांना उमेदवारी द्यावी, अशा घोषणाबाजी गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेcongressकाँग्रेसBJPभाजपा