श्रीरामपुरात साडेचार कोटींची कामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:44+5:302021-07-02T04:14:44+5:30
कानडे म्हणाले, शहरातील कामांच्या गरजा समजून घेऊन विकास कामांचा आरखडा राबवला गेला पाहिजे. कोविड संकटामुळे रस्ते व स्वच्छतेची कामे ...

श्रीरामपुरात साडेचार कोटींची कामे मंजूर
कानडे म्हणाले, शहरातील कामांच्या गरजा समजून घेऊन विकास कामांचा आरखडा राबवला गेला पाहिजे. कोविड संकटामुळे रस्ते व स्वच्छतेची कामे काहीशी मागे पडली होती. आता मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठिंब्यामुळे साडेचार कोटी रुपयांची शहरातील कामे मंजूर झाली आहेत.
विड काळात ग्रामीण रुग्णालयाला निधी देऊन ५० बेडसची ऑक्सिजन सुविधा निर्माण केली. दररोज २०० बेडसना पुरेल एवढा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हाती घेतला. लहान मुलांना कोविडचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने ग्रामीण रुग्णालयात त्यांच्याकरिता २५ बेडच्या स्वतंत्र कक्षाची उभारणी केली जाणार आहे, असे कानडे म्हणाले.
ससाणे यांनी पालिकेकडून विकास कामांना ना हरकत दाखला मिळण्यास उशीर झाल्याचे नमूद करत ही कामे अन्यथा सहा महिन्यांपूर्वीच मार्गी लागली असती असे स्पष्ट केले.
नगरसेवक बिहाणी यांनी पालिका सत्ताधाऱ्यांनी या भागात चार वर्षांत एक रुपयाही निधी दिली नाही. मात्र आमदार कानडेंमुळे कामे मार्गी लागल्याचे सांगितले.
--------
पालिकेचे सहकार्य नाही
पालिकेकडून शहरातील विकास कामांसाठी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे दुर्दैवाने अडचणी निर्माण झाल्या, असे आमदार कानडे यावेळी म्हणाले.
-------------