रस्ता दुरुस्तीसाठी कार्यकर्ते बसले खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:40+5:302021-09-12T04:25:40+5:30
दोन वर्षांपासून रस्ता दुरुस्ती करण्यासाठी लढा सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या मार्च महिण्यात काम चालू होणार होते. परंतु काम ...

रस्ता दुरुस्तीसाठी कार्यकर्ते बसले खड्ड्यात
दोन वर्षांपासून रस्ता दुरुस्ती करण्यासाठी लढा सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या मार्च महिण्यात काम चालू होणार होते. परंतु काम चालू झाले नाही. नगर- मनमाड खड्ड्यामध्ये अनेक अपघात झाले. या अपघातात अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आंदोलन हाती घेतल्यानंतर प्रशासनाने माती मिश्रित खडीने खड्डे बुजविण्याचे सुरू केले आहे. परंतु अवघ्या एकाच दिवसात खड्डे जै थे झाले आहेत. आता या आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वसंत कदम, देवेंद्र लांबे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यानंतरही रस्ता दुरुस्तीसाठी भांडावे लागते आहेत हे खर तर दुर्दैव आहे. आंदोलकांना खड्ड्यात गाडून घ्यावे लागले तरी शासनाना जाग येत नाही.
मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या रस्त्याचा मार्गी लावावा. आता खड्ड्यात गाडून घेतले यापुढे खड्ड्यात आत्मदहन करू, असा इशारा हसन सय्यद यांनी दिला आहे.
याप्रसंगी देवेंद्र लांबे, वसंत कदम, हसन सय्यद, प्रमोद विधाटे, सोनू साळुंके, राजेंद्र साळुंके, संजय वाणी, गोटूराम वाणी, सुयोग सिनारे, मयूर मोरे, नशीब पठाण, अमोल वाळुंज, श्रीकांत शर्मा, सचिन तारडे, तुषार कदम, प्रसाद कदम, सचिन कदम, नितीन मोरे, विठू राऊत, दुर्वेश वाणी, अमोल कदम, सुहास भांड, जालिंदर दौंड, बाबासाहेब खांदे, संतोष कदम, अनुप राऊत, वैभव कदम, वैभव गाडे, संदेश पाटोळे, अजिंक्य गायकवाड सहभागी झाले होते. पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल, डी.एन.गर्जे, अशोक शिंदे, दादासाहेब नरोटे, दादासाहेब रोहकले, संतोष ठोंबरे, होमगार्ड चांगदेव कोबरणे, बाळासाहेब वराळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
( ११ देवळाली प्रवरा)