सुप्यातून कामगारांची घरवापसी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:31+5:302021-04-18T04:20:31+5:30
सुपा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारांची घरवापसी सुरू झाली आहे. असे असली तरी हे ...

सुप्यातून कामगारांची घरवापसी सुरू
सुपा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारांची घरवापसी सुरू झाली आहे. असे असली तरी हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेने अतिशय कमी आहे. परंतु त्यांना मदतीच्या हातांची गरज आहे.
बाहेरच्या राज्यातील, दुसऱ्या जिल्ह्यातील कामगार कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर पुन्हा कामावर रुजू झाले होते. सर्व हळूहळू स्थिरावत असताना पुन्हा कोरोनाचे पुनरागमन झाले. त्यामुळे गावाकडे जाऊन तरी काय करणार? त्यापेक्षा येथेच राहून डटकर मुकाबला करेंगे.. अशा भाषेत परप्रांतीय तरुणांनी खंबीर भूमिका घेतल्याचे दिसत आहे, तर कोरोना काळात रोजगार हिरावला गेलेले कामगार, मजूर, घरेलू काम करणाऱ्या महिला ज्यांची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे सरकारी योजनांपासून वंचित राहिलेले लोक यांना मदत करणाऱ्या हातांची प्रतीक्षा आहे. घरची गावाकडची मंडळी, नातेवाईक चिंतित असून, सांगून ही त्याची काळजी कमी होत नाही. त्यामुळे गावाकडे जावं लागतंय, असेही काही जणांनी सांगितले. तर बाहेरच्या राज्यात प्रमाण जास्त असल्याने आणखी धोका वाढवायला नको म्हणत इथंच थांबून घरी राहून सुरक्षित राहण्याचा विचार करणारे कामगार इथे आहेत. कारखान्यात तपासणी होतेय, पॉझिटिव्ह निघाले तर उपचार सुविधा मिळतात. त्यामुळे सुप्यातील काही कारखान्यातील कामगार वर्ग सुप्यातच थांबल्याने पूर्वीसारखे कामगारांचे लोंढेचे लोंढे दिसत नाहीत. नगर-पुणे रोडवरील वाहतूक थंडावली आहे. रोडवरची दुकाने, हॉटेल, हारांची दुकाने बंद असल्याने रोडवर भयाण शांतता दिसतेय. गतवर्षी सुप्यातून जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी होती. त्यांच्यासाठी राहण्यासाठी स्वतंत्र अलगीकरण कक्ष निर्माण करण्यात येऊन तेथे जेवणाची व उपचाराची व्यवस्था केली होती, असे तत्कालीन मंडलाधिकारी नंदकुमार साठे यांनी सांगितले. यावर्षी मात्र चित्र बदललेले दिसतेय. रोड सुनसान असून, सर्व काही शांत असल्याने ही चेन ब्रेक करण्यात प्रशासनाला यश मिळेल असे चित्र आहे.
..
१७ सुपा एमआयडीसी
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी परिसरातून असे क्वचित चार, दोन जण गावाकडे निघालेले दिसत आहेत.