प्रभूवाडगाव ते गदेवाडी रस्त्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:40+5:302021-07-11T04:16:40+5:30
शेवगाव : तालुक्यातील प्रभूवाडगाव ते गदेवाडी दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून निधीची वाट न पाहता जिल्हा परिषद सदस्या हर्षदा ...

प्रभूवाडगाव ते गदेवाडी रस्त्याचे काम सुरू
शेवगाव : तालुक्यातील प्रभूवाडगाव ते गदेवाडी दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून निधीची वाट न पाहता जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी स्वखर्चातून काम सुरू केले आहे.
शनिवारी दुपारी एक वाजता जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे हस्ते प्रभूवाडगाव ते गदेवाडी या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच अशोक ढाकणे, देविदास दराडे, शरद दराडे, रवींद्र कराड, दीपक बटूळे, सुधाकर खेडकर, राजेंद्र बटूळे, शिवाजी बटूळे, लक्ष्मण खेडकर, विश्वनाथ बटूळे, अंबादास बटूळे, अर्जुन दराडे, तुकाराम केदार, भागीनाथ बटूळे, परमेश्वर खेडकर, बाबासाहेब बटूळे, नारायण बटूळे, भगवान खेडकर, महादेव बटूळे, विठ्ठल केदार, गोरक्षनाथ बटूळे, देविदास बटूळे, संतोष ढाकणे, वैशाली दराडे, मनीषा दराडे, गीता बटूळे, उषा अंगरखे, पल्लवी दराडे, अंजना खेडकर, अहिल्याबाई दराडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काकडे म्हणाल्या की, रस्ता म्हणजे दोन गावांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. रस्त्याअभावी आपले दळण-वळण ठप्प होते. त्यामुळे तुम्ही आपापसातील वाद मिटवून रस्त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन रस्ता करून घ्यावा. काकडे यांनी स्वखर्चातून रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल अशोक ढाकणे यांनी त्यांचे आभार मानले.
-----
महिलांनी सांगितल्या अडचणी..
रस्त्याअभावी कित्येक महिलांना प्रसूतीवेळी बैलगाडीने न्यावे लागते. त्यामुळे अनेकींचे सीजरिंग तर काहींचे गर्भ खराब झाले. शाळकरी मुलांनाही पावसाळ्यात दप्तरे डोक्यावर घेऊन चिखल तुडवत तर कधी पाण्यातून वाट शोधत मार्ग काढावा लागतो. जास्त पाऊस झाला तर शाळा बुडवावी लागते, अशा भावना जनाबाई नागरे, मंदा बटूळे यांनी व्यक्त केल्या.