कठोर परिश्रम घ्या, ध्येय गाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST2020-12-28T04:12:15+5:302020-12-28T04:12:15+5:30
श्रीगोंदा : स्पर्धा परीक्षा देताना अभ्यासक्रम कोणता आहे, त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी. त्यासाठी चांगल्या लेखकांच्या पुस्तकांची निवड ...

कठोर परिश्रम घ्या, ध्येय गाठा
श्रीगोंदा : स्पर्धा परीक्षा देताना अभ्यासक्रम कोणता आहे, त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी. त्यासाठी चांगल्या लेखकांच्या पुस्तकांची निवड करावी. आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावे, नक्कीच यश मिळेल, असा विश्वास अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी व्यक्त केला.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाचे शिखर सर करण्यासाठी श्रीगोंदा येथील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट देण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या व्याख्यानाचेही आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग खेतमाळीस हे होते.
दिलीप तेजनकर म्हणाले, तुम्हाला काय व्हायचे ते एकदा ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण सुरू करा. चुका सुधारत चला. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हिंमत सोडू नका.
यावेळी पांडुरंग खेतमाळीस, प्रशांत गोरे, विजया घावटे, प्रा. प्रांजल कुलकर्णी, प्रतिभा भोसले, विशाल चव्हाण यांची भाषणे झाली.
यावेळी नगरपालिका अधिकारी प्रियंका शिंदे, विठोबा निंबाळकर, संगीता तनपुरे, दिलीप काटे, मच्छिंद्र सुपेकर, संतोष धुमाळ, उद्धव खामकर, किरण ढवळे, अरविंद कापसे, प्रशांत भोसले, पोपट जाधव, बापूराव ढवळे, शरद मचाले, बजरंग नेटके, पांडुरंग शेलार, डॉ. अरुण रोडे, सुरेखा शेंद्रे, शुभांगी लगड, बबन गोरे, अंकुश घाडगे, मधुकर काळाणे, किसन वऱ्हाडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. संजय लाकुडझोडे यांनी केले.
फोटो : २७ श्रीगोंदा
श्रीगोंदा येथील पुस्तके वाटप कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.