‘सत्ता नसताना निष्ठेने काम करा’
By Admin | Updated: June 10, 2016 23:37 IST2016-06-10T23:28:15+5:302016-06-10T23:37:55+5:30
अहमदनगर : पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून निष्ठेने काम करावे असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.

‘सत्ता नसताना निष्ठेने काम करा’
अहमदनगर : केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी सत्तेबाहेर आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून निष्ठेने काम करावे असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. शुक्रवारी पक्षाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहरजिल्हाध्यक्ष संग्राम जगताप बोलत होते.
नगर येथील राष्ट्रवादी भवनात कळमकर यांच्या हस्ते शुक्रवारी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बोलतांना सर्वच वक्त्यांनी वर्धापनदिनाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. पुन्हा एकदा पक्षाला गत वैभव मिळवून द्यावे, असे आवाहन केले. ध्वजारोहणानंतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सर्व फं्र टलच्या प्रमुखांची आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी घुले, जगताप, प्रदेश सरचिटणीस तुकाराम दरेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर १० वी, १२ वी, स्पर्धा परीक्षा यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच युपीएसी परीक्षेत ८७ वी रँक मिळवणारे डॉ. नवनाथ गव्हाणे यांचाही सत्कार करण्यात आला. पक्षाच्यावतीने तालुका पातळीवर ध्वजारोहण आणि वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती शरद नवले, राजेंद्र फाळके, तुकाराम दरेकर, सेवादलाचे हानिफ जरीवाला, निर्मला मालपाणी, कपिल पवार, माधुरी लोंढे, अभिजित खोसे, रेश्मा आठरे, वैभव ढाकणे, गणेश गव्हाणे, फारू क रंगरेज यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी भवन येथे शुक्रवारी झालेला कार्यक्रम हा जिल्ह्यासह शहर जिल्हा राष्ट्रवादीचा संयुक्त कार्यक्रम असल्याची माहिती युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिली. सत्कार समारंभाला उपस्थित असणारे जवळपास सर्व गुणवंत शहरातील असल्याचे त्यांनी सांगितले.