नगर जिल्ह्यात चर्मकार महासंघाचे कार्य कौतुकास्पद : घोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:46+5:302021-08-15T04:23:46+5:30
यावेळी राज्य सदस्य कैलास गांगर्डे, सचिव बापूसाहेब देवरे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, अभिनव सूर्यवंशी, वैभव लोकरे, ज्ञानेश्वर महिस्माले, रावसाहेब ...

नगर जिल्ह्यात चर्मकार महासंघाचे कार्य कौतुकास्पद : घोडके
यावेळी राज्य सदस्य कैलास गांगर्डे, सचिव बापूसाहेब देवरे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, अभिनव सूर्यवंशी, वैभव लोकरे, ज्ञानेश्वर महिस्माले, रावसाहेब कानडे आदींसह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये व कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे चर्मकार महासंघाच्या वतीनेदेखील त्यांचा सत्कार करण्यात आला. घोडके यांना सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले कार्य केल्याबद्दल कै. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव पुरस्कार नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. चर्मकार महासंघाची आढावा बैठक घेऊन अहमदनगर शहराचे कार्य उत्तमरित्या चालू असून त्या कार्याची प्रेरणा आम्हालासुद्धा मिळेल, असे सांगितले. यावेळी कैलास गांगर्डे व संतोष उदमले यांनी बैठकीत मनोगत व्यक्त केले.
------
फोटो - १४ चर्मकार संघ
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांचा नगर येथे राष्ट्रीय चर्मकार
महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.