वर्कऑर्डरनुसार काम करा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:15+5:302021-07-14T04:25:15+5:30
ब्राम्हणी : वांबोरी-नगर रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम वर्कऑर्डरप्रमाणे करा, अन्यथा अधिकारी व ठेकेदार यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, ...

वर्कऑर्डरनुसार काम करा, अन्यथा कारवाई
ब्राम्हणी : वांबोरी-नगर रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम वर्कऑर्डरप्रमाणे करा, अन्यथा अधिकारी व ठेकेदार यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी तंबी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
नगर-वांबोरी रस्त्याच्या कामास तनपुरे यांच्याहस्ते सोमवारी प्रारंभ झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे होते.
यावेळी सुरेश बाफना, किसनराव जवरे, एकनाथ ढवळे, नितीन बाफना, गोविंदराव मोकाटे, रघुनाथ झिने, केरू पानसरे, कृष्णा पटारे, उपसरपंच मंदाताई भिटे, ईश्वर कुडमुडे, गोरक्षनाथ वेताळ, ऋषिकेश मोरे, संभाजी पागिरे आदी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून नगर-वांबोरी रस्त्याचे काम दुर्लक्षित व प्रलंबित होते. अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करत तीन टप्प्यात या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आता हे काम सुरू झाले आहे. हे काम दर्जेदार व्हावे, अशा सूचना तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
................
तनपुरेंच्या कामाबाबत समाधान
या रस्त्याचे यापूर्वी अनेक माजी लोकप्रतिनिधींनी भूमिपूजन केले होते. मात्र अद्याप हे काम अपूर्णच राहिले. नामदार तनपुरे यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने वांबोरी परिसरातील गावांमधून समाधान व्यक्त होत असल्याची भावना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी व्यक्त केली.