महिलादिनी शिक्षिका महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:42+5:302021-03-10T04:21:42+5:30
सुपा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यातील सुपा आणि परिसरातील शिक्षिका यांचा शिक्षक ग्रुपच्यावतीने सन्मान करण्यात आला. ...

महिलादिनी शिक्षिका महिलांचा सत्कार
सुपा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यातील सुपा आणि परिसरातील शिक्षिका यांचा शिक्षक ग्रुपच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी रंजना गुंड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. वर्षा पुजारी व प्रियंका शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. पुजारी यावेळी म्हणाले, ‘महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब आणि समाजहिताचे काम चांगले करता येईल.’
प्रियंका शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला सबलीकरण व सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे. महिला बचतगट व स्थानिक प्रशासन संस्थेच्या माध्यमातूनदेखील चांगले सबलीकरण होऊ शकते म्हणून महिलांनी सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी केंद्रप्रमुख बाळासाहेब साबळे, सचिन परांडे, संतोष दिवटे, प्रकाश भुजबळ, दत्तात्रय मेमाने, संजय मगर, कानिफनाथ गायकवाड, विलास भालेकर, दत्ता शिंदे, राजेंद्र गवळी, संदीप पठारे, भाऊ पवार आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री चौधरी यांनी केले. प्रास्ताविक रंजना गुंड तर पौर्णिमा पठारे यांनी आभार मानले.