महिलांनी पुढाकार घेऊन कुटुंबाची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:02+5:302021-02-21T04:39:02+5:30

नगरपालिकेत हळदी कुंकू समारंभ, माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा ममता ...

Women should take the initiative and take care of the family | महिलांनी पुढाकार घेऊन कुटुंबाची काळजी घ्यावी

महिलांनी पुढाकार घेऊन कुटुंबाची काळजी घ्यावी

नगरपालिकेत हळदी कुंकू समारंभ, माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, आरोग्य सभापती विजय सदाफळ, महिला व बालकल्याण सभापती सविता सदाफळ, विमल आरणे, बांधकाम सभापती अनुराधा तपे, नगरसेविका सुरेखा मेहेत्रे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ जगताप, सचिन मेहेत्रे, दशरथ तुपे उपस्थित होते. हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने राहाता शहरातील महिला मास्क तसेच सोशल डीस्टन्सींगचे पालन करुन राहाता नगरपालिकेत उपस्थित होत्या.

पिपाडा म्हणाल्या, कोरोना विषाणुने पुन्हा एकदा संसर्ग वाढला असुन गृहिणी म्हणुन आपण विषेश काळजी घ्यावी. नियमित मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डीस्टन्स पाळणे या व अशा अनेक दक्षता घेवुन आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी. यावेळी माझी वसुंधरा अभियानाबाबत हरित शपथ घेण्यात आली. हळदी कुंकू यानिमित्ताने एकमेकांच्या विचारांची देवान घेवाण होते.

डॉ.राजेंद्र पिपाडा म्हणाले, कोराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नव्याने नियमावली तयार केली आहे. त्या नियमांचे पालन करुन स्वत:ची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा प्रशासन पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने पाऊल उचलेल.

दशरथ तुपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नगरसेवक भिमराज निकाळे यांनी आभार व्यक्त केले.

( फोटो आहे)

Web Title: Women should take the initiative and take care of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.